प्रेमात झाला गेम ; गर्लफ्रेंडमुळे कुख्यात गँगस्टर NCB च्या जाळ्यात
गेल्या सहा महिन्यांपासून गँगस्टर एनसीबीच्या रडारवर
Updated: Jul 6, 2021, 09:24 AM IST
मुंबई : डोंगरी ड्रग्स फॅक्टरी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने मुंबईतील कुख्यात गँगस्टरला ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील डोंगरी परिसरातून ड्रग्स फॅक्टरी प्रकरणात फरार आरोपी जमन हिदायतुल्ला खान उर्फ सोनू पठानला अटक करण्यात आली आहे. (NCB arrests absconding accused gangster Sonu Pathan who went to meet his girlfriend )
गेल्या सहा महिन्यांपासून एनसीबी चौकशीकरता समन पाठवत होते. मात्र सोनू पठान हजर झाला नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एनसीबीने मुंबईतील डोंगरी परिसरात दाऊद गिरोहशी जोडलेल्या लोकांद्वारे ही ड्रग्स फॅक्टरी असल्याचा खुलासा झाला आहे. एनसीबीला येथून 12 करोड रुपयांचं ड्रग्स मिळालं आहे.
या प्रकरणाच चिंकू पठान आणि आरिफ भुजवाला नावाच्या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. या दोघांकडून कसून चौकशी केल्यानंतर सोनू पठानचं नाव समोर आलं आहे. यानंतर सोनू पठानचा शोध सुरूच होता. अखेर सोनू पठान गर्लफ्रेंडला भेटायला गेला असताना एनसीबीने त्यांना ताब्यात घेतलं आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सुत्रांकडून माहिती मिळाली होती की, पठान आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला पायधोनी परीसरात येणार आहे. यावर अंमलबजावणी करताना एनसीबीने संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली होती. नाकाबंदीतच सोनू पठानला पकडण्यात आलं.
या अगोदर एनसीबीने प्रकरणाशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस चिंकू पठान उर्फ परवेज खान आणि डॉन करीम लाला यांचा नातेवाईक आरिफ भुजवाला यांना अटक करण्यात आलं.
Tags: