comparemela.com


प्रशांत जोशी
डोंबिवली : डोंबिवलीतील कोकणवासी आणि कट्टर राणे समर्थक प्रेमींनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने परस्परांना भेटून आनंदाचे आलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणचे कै. शाहू सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून राणेंच्या शपथ समारंभानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी महापौर कै. शाहू सावंत यांचे सुपुत्र, शाहू सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीमध्ये शाहू सावंत प्रतिष्ठान कार्यालय कैलासनगर डोंबिवली, पश्चिम येथे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकते कैलास पवार, नीलेश घोसाळकर, तुषार नाईक, भूषण झांजम, भोसले, बबन राणे, प्रशांत कुलकर्णी तसेच डोंबिवलीतील राणे समर्थक उपस्थित होते.
नारायण राणे यांच्या या निवडीचा आनंद झाल्याचे माजी नगरसेवक तथा उर्सेकरवाडी माघी गणेशोत्सवाचे अध्यक्ष सुदेश चुडनाईक यांनीही कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. यावेळी ते म्हणाले की, राणे यांच्या प्रत्येक निवडणुकीत कोकणात स्वतः जातीने उपस्थित असतो. त्यांची कार्य करण्याची पद्धत आणि प्रशासनावर असणारा वचक यामुळे रोजगारनिर्मिती होऊन देशाला नक्कीच मदत होईल.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त होत असल्याचे सांगून म्हणाले की, राणेसाहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री म्हणून संधी प्राप्त करून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणाला न्याय देण्याचे काम केले आहे. राणे यांना मिळालेल्या संधीचा त्यांनी कोकणासाठी आणि महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी फायदा करून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मिळालेल्या खात्यातून कोकणातून व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर हे नक्कीच थांबेल. त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून ते कोकणात आणि विशेषकरून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करून येथील अर्थकारणात तसेच दरडोई उत्पन्नात वाढ करतील, याची आम्हासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड अपेक्षा आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, केंद्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे व खासदार कपिल पाटील यांच्या नियुक्तीने ठाणे जिल्ह्यात आनंद होत आहे. राणेसाहेब कोकणचे सुपुत्र असून त्यांच्यामुळे भाजपला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यांच्यामुळे संगठना वाढीस मदत होणार आहे.
त्यांच्या कामाची हातोटी आणि प्रशासनावरील कामाची पकड व जे खाते मिळाले आहे, त्याचा चांगला उपयोग करून नोकऱ्या व उद्योगधंदे वाढतील, यात शंका नाही. तर खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाने तसेच नरेंद्र मोदीजींनी संधी दिली ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने किंवा सहकार्याने त्यांना मंत्रीपद मिळाले. आगरी समाजातील एका उमद्या नेतृत्वाला ठाणे जिल्ह्यातून प्रथमच केंद्रामध्ये संधी मिळाली आहे.
कपिल पाटील यांच्या रूपाने भाजप ठाणे जिल्ह्याचे किंबहुना महाराष्ट्राचे व देशाचे चांगल्याप्रकारे काम करून विकास करतील, हा विश्वास आहे.

Related Keywords

Konkan ,Maharashtra ,India ,Kalyan ,Pacific Joshi Dombivali ,Dombivli Rane ,Narendra Modi ,Narayan Rane ,Shashi Kant ,Pacific Kulkarni ,Baban Rane ,Shahu Savant Establishment Office ,Dombivali Municipal Corporation ,Foundation Kailash Pawar ,Shahu Savant Foundation ,Narayana Rane ,Shahu Savant ,Tsakhkadzor Fireworks ,Kalyan Dombivali Municipal Corporation ,Shahu Savant Foundation President ,Sarvesh Shahu Savant ,President Sudesh ,Prime Minister Narendra Modi ,District Shashi Kant ,Dev Patil ,Thane District ,கொங்கன் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,கல்யாண் ,நரேந்திர மோடி ,நாராயண் றானே ,ஷாஷி காந்த் ,தொம்பிவலி நகராட்சி நிறுவனம் ,நாராயணா றானே ,கல்யாண் தொம்பிவலி நகராட்சி நிறுவனம் ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,தானே மாவட்டம் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.