comparemela.com


ठाणे (वार्ताहर): गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या विरोधात ठाण्यातील गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त करत मंगळवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘आमचा उत्सव, आमची जबाबदारी’ अशी असे सांगत या मंडळांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्य सरकाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्यानंतर, प्रशासन व गणपती उत्सव मंडळ हे आमने- सामने आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीच्या निर्बंधांवरून मंडळांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे येणारे काळात प्रशासन व गणपती मंडळ यांच्यात सामना रंगलेला दिसणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गणेशोत्सवामधील नियम शिथील केले नाहीत तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ठाण्यातील गणोशोत्सव समितीने दिला होता. मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच उद्धव ठाकरे आणि राज्य शासनाच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. ठाण्यात जवळपास २५० हून जास्त गणपती मंडळ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

Related Keywords

Uddhav Thackeray ,Committee Kelly ,Ganesh Office ,Thane The Committee ,Thane Ganesh ,Ganesh State ,Thane Ganesh Boards ,State Regulations ,Adminb Ganesh ,Adminb Ganesh Circle ,Distribution Thackeray ,Tuesday Ganesh Regulations ,Ganesh Circle ,Thane District Ganesh ,உத்தவ் தாக்கரே ,நிலை ஒழுங்குமுறைகள் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.