comparemela.com


महागाईचा मोठा झटका, दुधानंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागला
 LPG Cylinder - स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे 
Updated: Jul 1, 2021, 09:30 AM IST
मुंबई : LPG Cylinder - कोरोनाचा काळ, त्यात महागाईची छळ सर्वसामान्यांना अधिक तीव्र बसू लागली आहे. आजपासून काही बँकिंग व्यवहार महागले आहेत. तसेच अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आता स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (Oil companies have increased the price of LPG)
एलपीजी किंमतवाढ झाल्याने सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले आहे. केंद्र सरकारला याबाबत जबाबदार धरले आहे. पेट्रोल आणि डिझेल आधीच महागाईच्या गगनाला भिडले आहेत, आता सरकारी तेल कंपन्यांनीही एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत आजपासून 14.2 किलो सिलिंडर 809 रुपयांऐवजी 834.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच थेट 25.50 रुपयांची वाढ झाली आहे.
दर महिन्याच्या 1 तारखेला किंमती बदलतात
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे  (LPG Price) दर बदलतात. यापूर्वी 1 मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. यापूर्वी एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली गेली होती, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये किंमती वाढविण्यात आल्या.
इतर शहरांमध्ये एलपीजीची किंमत
मुंबईतही  14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर आता 834.50  रुपये आहे, तर आतापर्यंत  809 रुपये होता. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 835.50 रुपयांवरून वाढून 861 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून 850.50 रुपये द्यावे लागतील, जे कालपर्यंत 825 रुपये होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला 872.50 रुपये द्यावे लागतील. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एलपीजीसाठी  841.50 द्यावे लागतील.
एलपीजी सिलिंडर यावर्षी 140.50 रुपयांनी महागला 
दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीस 2021 म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत  694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये प्रति सिलिंडरमध्ये 719 रुपये झाली. 15 फेब्रुवारीला ही किंमत 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करुन 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करून 819 रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरूवातीला दहा रुपयांची कपात झाल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये 140.50 रुपयांनी वाढ झाली आहे.
Tags:

Related Keywords

Ahmedabad ,Gujarat ,India ,Mumbai ,Maharashtra ,Calcutta ,West Bengal ,New Delhi ,Delhi ,Chennai ,Tamil Nadu , ,Amul Milk ,Price Mumbai ,Gujarat Ahmedabad ,January New Delhi ,அஹமதாபாத் ,குஜராத் ,இந்தியா ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,கால்குட்டா ,மேற்கு பெங்கல் ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,சென்னை ,தமிழ் நாடு ,அமுல் பால் ,குஜராத் அஹமதாபாத் ,ஜனவரி புதியது டெல்ஹி ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.