comparemela.com


होव (वृत्तसंस्था) : दुसरी टी-ट्वेन्टी ८ धावांनी जिंकताना भारताच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तसेच मालिकेतील आव्हान कायम राखले.
अपयशी सलामीनंतर हरमनप्रीत कौर आणि सहकाऱ्यांना विजय आवश्यक होता. रविवारी झालेल्या सामन्यात पाहुण्यांनी सर्व आघाड्यांवर खेळ उंचावला. भारताचे १४८ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. इंग्लंडची मजल निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावांपर्यंत गेली.
इंग्लंडकडून सलामीवीर टॉमी बॉमाँट चांगलीच खेळी केली. तिने ५० चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. इंग्लंड संघाची धावसंख्या १३ असताना डॅनी वॉटच्या पहिली विकेट पडली. त्यानंतर ३२ धावा असताना नताली सिव्हर (१) धावचीत झाली. ती केवळ एक धाव करून बाद झाली. त्यानंतर संघाची धावसंख्या १०६ असताना टम्सिन पायचीत झाली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीला गळती लागली. इंग्लंडचे तीन फलंदाज धावचीत करण्यात भारताला यश आले. नताली सिवर, हिथर नाइट आणि सोफिया डंकले धावचीत होऊन माघारी परतल्या. पाहुण्यांकडून लेगस्पिनर पूनम यादव (२ विकेट) सर्वात यशस्वी ठरली. अरुंधती रेड्डी तसेच दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताचे क्षेत्ररक्षणही सुरेख झाले. त्याआधी, भारताने ४ बाद १४८ धावांची मजल मारली. शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने ७० धावांची दमदार सलामी दिली. मानधनाने १६ चेंडूत ४८ धावा केल्या. शफाली वर्माचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. तिने ३८ चेंडूत ४८ धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्तीने बाजू सावरली. हरमनप्रीतने २५ चेंडूत ३१ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. दीप्ती शर्मा २४ धावांवर नाबाद रािहली.

Related Keywords

India ,Poonam Yadav ,Arundhati Reddy ,Harmanpreet Kaur ,Dipti Sharma ,Tommy ,India Fine ,இந்தியா ,பூனம் யாதவ் ,அருந்ததி சிவப்பு ,ஹர்மன்பிரீத் காயார் ,டிப்டி ஷர்மா ,டாமி ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.