comparemela.com


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. त्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे. ‘कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळायलाच हवी. पण ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. तसेच वारसांना नुकसानभरपाईची किती रक्कम देण्यात यावी, हे निश्चित करण्यासाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे ६ आठवड्यांच्या आत तयार करावीत’, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत द्यावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने याला नकार दिला. एक निश्चित रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकसानभरपाईची रक्कम ठरवावी, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आणि हजारो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यान, कोरोना बळींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Related Keywords

New Delhi ,Delhi ,India , ,Supreme Court ,Management The Authority ,Supreme Court Wednesday Center ,Court Center ,I Supreme Court ,Supreme The Court ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,இந்தியா ,உச்ச நீதிமன்றம் ,நீதிமன்றம் மையம் ,நான் உச்ச நீதிமன்றம் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.