China President Jinping Visits Tibet To Review Project On Brahmaputra River
ल्हासा:राष्ट्रपती जिनपिंग यांनी तिबेटचा केला दौरा,ब्रह्मपुत्र नदीवरील प्रकल्पाचा आढावा
ल्हासा11 तासांपूर्वी
कॉपी लिंक
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अरूणाचल प्रदेशाजवळील तिबेटचा दौरा केला. भारतासोबत सुरू असलेल्या सीमा वादादरम्यानच जिनपिंग यांची ही भेट आहे. २०११ मध्ये सत्तेवर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच तिबेट दौरा आहे. राष्ट्रपती बुधवारी न्यिंगची मेनलँड विमानतळावर आले होते, असा दावा वृत्तसंस्थेने केला. स्थानिक नागरिक तसेच अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रातील जीवसृष्टी व पर्यावरण संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी न्यांग नदीवर बांधलेल्या पुलाचा दौरा केला. त्याला तिबेटच्या भाषेत यारलुंग जांग्बो असे म्हटले जाते. चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात विशाल धरण बांधणार आहे.
भारताने त्यास विरोध केला आहे. राष्ट्रपती तिबेटची राजधानी ल्हासात आहेत. चीनने या क्षेत्रात विजेवर चालणाऱ्या बुलेट ट्रेन यशस्वीपणे सुरू केल्यानंतर चिनी राष्ट्रपतींची ही भेट महत्त्वाची मानली जाते. ही बुलेट ट्रेन राजधानी ल्हासा व न्यिंगचीला जोडणारी आहे. रेल्वेचा वेग ताशी १६० किमी आहे. या रेल्वेमुळे स्थैर्याला सुरक्षितता मिळण्यासाठी मदत होईल, असे जिनपिंग यांनी म्हटले होते. चीन-भारताचे युद्ध झाल्यास हा रेल्वे मार्ग चीनसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. चीन या भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. सुरक्षेच्या आडून सीमेवर कुरापती करण्यासाठी चीनच्या हालचाली वाढल्याचे दिसले आहे.
बातम्या आणखी आहेत...