comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : ‘कॅसेटकिंग’ गुलशन कुमार यांच्या हत्याकांडातील दोषी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. रौफचे एकूण वर्तन पाहता तो दयेस पात्र नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तर, रौफचा भाऊ रशीद मर्चंट यालाही दोषी धरत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आलेले ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांना मात्र न्यायालयानं दिलासा दिला आहे.
टी सिरीजचे गुलशन कुमार यांची १९९७ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला विशेष मोक्का कोर्टाने २००२ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात त्याने लगेचच मुंबई हायकोर्टात अपील केले. एप्रिल २००९ मध्ये कुटुंबीयांना भेटण्यासाठी काही दिवसांसाठी त्याला फर्लोवर सोडण्यात आले होते. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन तो फरार झाला होता. तो शेजारच्या बांग्लादेशमध्ये पळून गेला होता. सीमाभागात घुसखोरी केली म्हणून बांग्ालादेशमधील पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तेथील कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांग्ालादेशमधील कोर्टाने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यानंतर विशेष मोक्का कोर्टाने मर्चंटला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात पाठवले होते.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,David Ibrahim ,Abdul Rauf David ,Crime Branch ,Abdul Rauf David Merchant ,Rashid Merchant ,Dawn David Ibrahim ,Court November ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,குற்றம் கிளை ,நீதிமன்றம் நவம்பர் ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.