comparemela.com


कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे सुपुत्र नारायण राणे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री होताच कणकवलीत जल्लोष करण्यात आला. मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले. कोकणात ७ जुलैची संध्याकाळ मोठी आनंदातच गेली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ना. नारायण राणे यांच्या नावाचा जल्लोष सुरू होता. कार्यकर्ते एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत होते.
कणकवली शहरात पटकीदेवी मंदिर, ढालकाठी, नरडवे नाका, नांदगाव, फोंडाघाट, खारेपाटण, कासर्डे, कनेडी आदी ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला गेला. कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या शपथविधी निमित्त कणकवली पटकी देवी मंदिर येथे एकत्र येत फटाके वाजवून व लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला. यावेळी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो…,नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है…!’ अशा घोषणा देत कणकवलीत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, मंगेश तळगावकर, मेघा गांगण, किशोर राणे, संजय कामतेकर, संदीप मेस्त्री, मिलींद मेस्त्री, अण्णा कोदे, राकेश परब, बबलू सावंत आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर फोंडाघाट येथे आनंद उत्सव साजरा केला. यावेळी राजन चिके भाजप जिल्हा उपाध्यक्ष, मनोज राणे सभापती, सुजाता हळदिवे, फोंडाघाट, बबन हळदिवे, प्रकाश पारकर उपसभापती, संतोष आंग्रे-सरपंच फोंडाघाट. संतोष राणे सरपंच वाघेरी, विश्वनाथ जाधव शक्ती केंद्र प्रमुख, प्रदीप राणे, ओमकार राणे, सिद्देश पावसकर, विजय फोडेकर, मिलींद लाड, नीलेश लाड, नितीन पारकर, दिलीप पारकर, उमेश राऊत, सुनील लाड, अजित नाडकर्णी, राजेश प्रभू देसाई, ऋतू तेंडुलकर, संजय खाडये, सौरभ पारकर, प्रथमेश पारकर, सुमन गुरव, विजयसिंह रावराणे, शामल म्हाडगुत, गणेश हळदिवे, गजानन सावंत आदी उपस्थित होते. नांदगाव येथे महिला अध्यक्ष हर्षदा वाळके, सरचिटणीस व सरपंच पंढरी वायगणकर, शक्ती प्रमुख भाई मोरोजकर, तोंडवली सरपंच मनाली गुरव, आयनल सरपंच बापू फाटक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
सावंतवाडी, कुडाळ घोषणांनी दुमदुमले
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजपच्या वतीने सावंतवाडीत फटाके फोडून व घोषणा देत जोरदार जल्लोष करण्यात आला.

Related Keywords

Konkan ,Maharashtra ,India ,Kankavli ,Nandgaon ,Uttar Pradesh ,Vishwanath Jadhav ,Dilip Parker ,Abhijeet Musale ,Vijay Singh Raorane ,Omkar Rane ,Rakesh Parab ,Sandeep Maestri ,Manali Gurav ,Suman Gurav ,Narayana Rane ,Pradeep Rane ,Milind Maestri ,Nitin Parker ,Narayan Rane ,Rajan Schickel ,Parker Deputy ,Hanna Court ,Tsakhkadzor Fireworks ,Dessert Issue ,Zila Parishad President Sanjana Savant ,Samir Powered ,Bablu Savant ,Light Parker Deputy Chairman ,Rane Village Waghera ,Lord Desai ,General Secretaryb Village ,Village Manali Gurav ,Village Bapu Gate ,கொங்கன் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,கங்கவிளி ,நந்த்கான் ,உத்தர் பிரதேஷ் ,நாராயணா றானே ,ப்ரதீப் றானே ,நாராயண் றானே ,பார்க்கர் துணை ,அண்ணா நீதிமன்றம் ,ஆண்டவர் தேசாய் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.