comparemela.com


Army Raids Taliban Stronghold, Launches Operation In Baldak On Pakistan Border
अफगाणिस्तान:तालिबानच्या तावडीतून जमीन साेडवण्यासाठी सैन्याची चढाई, पाकिस्तान सीमेवर बाेल्डकमध्ये कारवाई
काबूल6 तासांपूर्वी
कॉपी लिंक
छायाचित्र पाकिस्तानच्या चमन जिल्ह्यातील आहे. तालिबानींनी झेंडे फडकवत रॅली काढली होती.
अफगाणिस्तानच्या सैन्याने शुक्रवारी पाकिस्तान सीमेवर तालिबानच्या विराेधात माेहीम सुरू केली आहे. बाेल्डक जिल्ह्यात अफगाण सैनिक तालिबानच्या दहशतवाद्यांना भिडले. बाेल्डकचे व्यापारी मार्ग, बाजारपेठ, सैन्याच्या चाैक्यांवर तालिबानने मंगळवारी वर्चस्व मिळवले हाेते. अफगाण सैन्य त्यांना तावडीतून साेडवण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. घटनास्थळावरील पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, अफगाण सैन्याच्या कारवाईत डझनावर तालिबानी दहशतवादी जखमी झाले. त्यांच्यावर सीमेजवळील पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाेल्डक जिल्ह्यातील रहिवासी माेहंमद जहीर म्हणाले, अफगाणी सैनिक व तालिबानी दहशतवादी यांच्यात मुख्य बाजारपेठेत लढाई होत आहे. प्रचंड संघर्ष सुरू आहे. बाेल्डक जिल्ह्यातून बलुचिस्तानपर्यंत थेट रस्ता आहे. बलुचिस्तानमध्ये दशकांपासून तालिबानच्या कमांडरचा डेरा आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांसाठी या भागातून भरती केली जाते. बदगीस प्रांतातील राजधानी काला-ए-नवमध्ये युद्धबंदीसाठी तालिबानी नेत्यांशी वाटाघाटी केल्या जात असल्याचे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सैन्याची मदत करणाऱ्यांना अमेरिका साेबत नेणार
अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांच्या घरी परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तालिबानशी लढताना अमेरिकी सैनिकांची मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांना आता चिंता वाटू लागली आहे. अमेरिकी सैन्य परतल्यानंतर तालिबानी त्यांचे काय हाल करतील, असे त्यांना वाटत आहे. अमेरिकेचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, तालिबानविराेधातील लढाईत आमची मदत करणाऱ्या लाेकांना सैनिक मायदेशी घेऊन जातील.
शांतता नांदावी यासाठी भारत अफगाणसाेबत : जयशंकर
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ताश्कंदमध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांची भेट घेतली. त्यानंतर जयशंकर साेशल मीडियावर म्हणाले, राष्ट्रपती घनी यांच्याशी अंतर्गत व परिसरातील परिस्थितीबाबत चर्चा केली. अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी आम्ही आमच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. मानवी पातळीवर मदत सुरू ठेवू. १.५० लाख टन गहू पाठवला जाईल.
पाकिस्तानची तालिबानला मदत : उपराष्ट्रपती
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानवर गंभीर आराेप केले. सालेह म्हणाले, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाण लष्कर व हवाई दलास इशारा दिला आहे. बाेल्डक जिल्ह्यातून तालिबानींना हटवण्याचा प्रयत्न करू नका. परंतु प्रयत्न केल्यास पाकिस्तान त्याला कडक कारवाईने उत्तर देईल. पाकच्या हवाई दलाने तालिबानला काही क्षेत्रांत हवाई मदतही केली. पाकने सर्व आराेप फेटाळले.
बातम्या आणखी आहेत...

Related Keywords

Afghanistan ,India ,Pakistan ,Afghan , ,Afghan Army ,Pakistan Chaman District ,Friday Pakistan ,Taliban Start Kelly ,District Afghan ,Afghan Military ,Taliban Camp ,Jaishankar India Secretary ,President Ashraf ,இந்தியா ,பாக்கிஸ்தான் ,வெள்ளி பாக்கிஸ்தான் ,ப்ரெஸிடெஂட் அஷ்ரஃப் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.