comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवले आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुरूवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिले होते. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती.
बड्या नेत्यांची नावे
२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे होती.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Ajit Pawar ,Surender Mohan Aurora ,Anna Hazare ,Manikrao Jadhav ,Crime Branch ,Mama Rajendra Kumar Ghadge ,Minister Patil ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,அஜித் பவார் ,அண்ணா ஆபத்து ,குற்றம் கிளை ,அமைச்சர் பாட்டீல் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.