मराठवाड्यात सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. एकाच दिवशी आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. येथे जनजीवन विस्क�