comparemela.com


दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आयसीसीकडून आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दहा दिग्गज क्रिकेटपटूंना गौरवण्यात येणार आहे. त्यात भारताचे महान माजी क्रिकेटपटू विनू मंकड, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर आदींचा समावेश अहे.
भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदान दिलेल्या मंकड यांनी ४४ कसोटी सामने खेळले आहेत. यात ३१.४७ च्या सरासरीने २,१०९ धावा केल्या आहेत तर ३२.३२ च्या सरासरीने १६२ विकेट घेतल्या आहेत. मंकड यांची गणना भारताच्या महान अष्टपैलूंमध्ये केली जाते.
श्रीलंकेच्या संगकाराच्या नावे १४४ कसोटी सामने आहेत. त्याने ५७.४० च्या सरासरीने १२,४०० धावा केल्या. यात ३८ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने यष्ट्यांमागे १८२ झेल घेतलेत आणि २० स्टंपिंग केले. संगकाराच्या नेतृत्वात श्रीलंकेने २०११ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, त्यांना भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. संगकारा एक महान फलंदाज तसेच एक उत्तम यष्टीरक्षक होता.

Related Keywords

Dubai ,Dubayy ,United Arab Emirates ,India ,Zimbabwe ,Sri Lanka ,Lanka Sangakkara ,Andy Flower , ,World Test Championship ,Great Kelly ,Sri Lanka Sangakkara ,Sri Lanka World Cup ,Great Bat ,துபாய் ,ஒன்றுபட்டது அரபு அமீரகங்கள் ,இந்தியா ,ஸிஂபாப்வே ,ஸ்ரீ லங்கா ,ஆண்டி பூ ,உலகம் சோதனை சாம்பியன்ஷிப் ,ஸ்ரீ லங்கா உலகம் கோப்பை ,நன்று மட்டை ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.