comparemela.com

Card image cap


July 25, 2021
9
मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि  हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.
कोणत्याही कारणांमुळे आपली मान दुखू शकते.
Advertisements
दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये काम करणे, उशीचा चुकीच्या रितीने होणारा वापर, अनेक तास एकाच बाजूने मान झुकवणे, खराब पोझिशनमध्ये बसणे, संगणकाचे मॉनिटर खूप कमी किंवा अधिक उंचीवर असणे, व्यायाम करताना मान योग्य रितीने न वळवणे, दुचाकी वाहनांवरुन अधिक प्रवास करणे या कारणांमुळे मान दुखते. आपणही मानेच्या दुखण्याने त्रस्त असाल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी घरगुती उपचार देखील करु शकतात.
मानदुखीवरचे उपचार
मानेवर बर्फ फिरवाः मानेचे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळण्यासाठी दिवसातून अनेकदा पाच मिनिटांपर्यंत बर्फ मानेवर फिरवा. एवढेच नाही मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा. दुखणार्या जागी हिटिंग पॅडचा वापर करा. नक्कीच आराम मिळेल.
मानेवर मसाज करा महानारायण तेलासारख्या वेदनाशामक तेलाने मानेचा मसाज करा. आपली मान आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळेल. दुखणे कमी होईल.
सैंधव मीठाचा वापरः मानदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ हे औषधाप्रमाणे काम करते. त्याचा उपयोग स्नायूचे दुखणे आणि सूज कमी करण्यासाठी करता येतो. त्याच्या वापराने मानदुखीपासून आराम मिळेल. एका बाथटबमध्ये कोमट पाण्यात सैंधव मीठ टाका. या पाण्यात मानेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे बसा. आपल्याला आराम पडेल.
याकडे लक्ष द्या
काम करताना टेबल आणि खूर्चीचा वापर करा. बेडवर बसून काम करण्याचे टाळा
लॅपटॉप आणि डोळे याची पातळी 90 अंश असणे गरजेचे आहे.
दीर्घकाळापर्यंत काम करण्यासाठी लॅपटॉपऐवजी डॅशबोर्डचा वापर करावा.
दर चाळीस मिनिटानंतर वॉक करा.
रात्री झोपण्यासाठी पातळ आणि हलकी उशी वापरा.
मानदुखीवर ऍक्युप्रेशर, स्युझोक थेरपीचाही चांगला उपयोग होतो. तथापि, हे सर्व उपचार तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
– डॉ. संजय गायकवाड
Share

Related Keywords

, Salt Enter ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.