comparemela.com


July 16, 2021
11
गगनयान मोहिमेत होणार वापर : स्पेसएक्सचे सीईओ मस्क यांच्याकडून इस्रोचे कौतुक
वृत्तसंस्था /बेंगळूर
Advertisements
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मिशन गगनयानच्या यशाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इस्रोने लिक्विड प्रोपेलेंट विकास इंजिनाची तिसरी मोठय़ा कालावधीची यशस्वी हॉट टेस्ट केली आहे. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी या मोठय़ा यशासाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. त्यांनी इस्रोच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत ‘अभिनंदन’ असे म्हणत भारतीय ध्वजाचा इमोजी वापरला आहे.
ही टेस्ट मिशनसाठी इंजिन योग्यता गरजेच्या अंतर्गत जीएसएलव्ही एमके 3 यानासाठी एल 100 लिक्विड लेव्हलसाठी करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपेल्शन कॉम्पलेक्स परीक्षण केंद्रात इंजिनला 240 सेकंदांसाठी प्रक्षेपित करण्यात आले. इंजिनच्या चाचणीने उद्देशाची पूर्तता केली आहे.
गगनयान ही अंतराळातील भारताची पहिली मानवी मोहीम आहे. भारतीय प्रक्षेपण यानातून मानवाला पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठवून त्यांना परत आणण्याची क्षमता जगाला दाखवून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. या मोहिमेकरता सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या मोहिमेसाठीच्या निधीला 2018 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. इस्रोने रशियाची अंतराळ संस्था ग्लावकॉस्मोससोबत याकरता सहकार्याचा करार केला आहे.
प्रशिक्षण पूर्ण
ग्रूप कॅप्टन आणि तीन विंग कमांडर्स समवेत भारतीय वायुदलाच्या 4 अधिकाऱयांची मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. या अधिकाऱयांनी रशियाच्या ज्वोज्दनी गोरोडोक शहरात एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच दोन फ्लाइट सर्जन रशिया आणि फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
गगनयान मॉडय़ूलचे प्रशिक्षण
रशियात प्रशिक्षण घेतल्यावर या चारही गगननॉट्सना बेंगळूरमध्ये गगनयान मॉडय़ूलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे मॉडय़ूल इस्रोने तयार केले आहे. या मॉडय़ूलकरता अन्य देशाची मदत घेण्यात आलेली नाही.
मोहिमेला विलंब?
इस्रोने यापूर्वी डिसेंबर 2021 पर्यंत गगनयान मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले होते. तर मानवरहित मोहिमेसाठी डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 चा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण आता पहिली मानवरहित अंतराळ मोहीम डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण करण्याची तयारी आहे. दुसरी मानवरहित मोहीम 2022-23 मध्ये आणि त्यानंतर मानव मोहिमेसह अंतराळ यानाची योजना असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते.
यशस्वी अंतराळप्रवास
मागील काही काळापासून जगातील धनाढय़ांनी अंतराळ प्रवास करण्याकरता मोठे स्वारस्य दाखविले आहे. ब्रिटिश अब्जाधीश व वर्जिन ग्रूपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅनसन यांनी रविवारीच अंतराळाचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांनी वर्जिन गेलेक्टिकच्या व्हीएसएस युनिटी स्पेस प्लेनद्वारे 6 सदस्यांसह उड्डाण केले होते. कंपनीने 2022 च्या प्रारंभापासून कमर्शियल ऑपरेशन सुरू करण्याची योजना आखली आहे.
Share

Related Keywords

Bangalore ,Karnataka ,India ,Russia ,France ,Tamil Nadu ,Narendra Modi ,Jitendra Singh ,Junior ,Test Mission ,Test Kelly ,Prime Minister Narendra Modi ,Fort Kelly ,Central Cabinet ,Companion Agreement ,Mission December ,Minister Jitendra Singh ,பெங்களூர் ,கர்நாடகா ,இந்தியா ,ரஷ்யா ,பிரான்ஸ் ,தமிழ் நாடு ,நரேந்திர மோடி ,ஜிதேந்திரா சிங் ,ஜூனியர் ,சோதனை பணி ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,மைய மந்திரி சபை ,அமைச்சர் ஜிதேந்திரா சிங் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.