Sidhu Should Issue A Public Apology, Only Then Will The Meeting Take Place; Chief Minister Amarinder Singh's Condition
राजकीय:सिद्धूंनी जाहीर माफी मागावी, तेव्हाच भेट होईल; मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची अट
चंदीगड/जालंधर15 तासांपूर्वी
कॉपी लिंक
पंजाब काँग्रेसमधील अंतर्कलह दूर करण्याच्या फॉर्म्युल्यावर शनिवारीही शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. सूत्रांनुसार, प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाच्या घोषणेत अजूनही अनेक अडथळे आहेत. वीज संकटासह विविध मुद्द्यांवर सिद्धू सातत्याने सरकारविरुद्ध टिप्पणी करत आले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्यामुळे नाराज आहेत. सिद्धूंनी जाहीर माफी मागावी, त्यानंतरच त्यांच्याशी भेट-चर्चा होईल, अशी अट अमरिंदरसिंग यांनी घातली आहे.
काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याशी मोहालीत त्यांची भेट घेतली. त्या वेळी सिद्धू पंचकुला आणि चंदीगडमध्ये मंत्री, आमदार यांच्या घरी जाऊन पाठिंबा गोळा करत होते. मुख्यमंत्र्यांशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर दिल्लीला परतलेले रावत म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांचा जो निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांना मान्य असेल याचा आनंद आहे.
बातम्या आणखी आहेत...