Aurangabad heavy rains lash : राज्यात मुसळधार पावसामुळे ( heavy rains lash) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. (18 Gates of Jayakwadi dam opened as heavy rains lash catchment area in Maharashtra's Aurangabad)